#

Advertisement

Thursday, January 30, 2025, January 30, 2025 WIB
Last Updated 2025-01-30T10:38:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांसमोरच बैठकीत बाचाबाची

Advertisement

बीड : जिल्हा नियोजन समिती बैठकीत धनंजय मुंडे, सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनावणे आमने-सामने आले. बीडची बदनामी आणि अधिकाऱ्यांवर दहशत असल्याच्या आरोपांवरुन तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी धनंजय मुंडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस, बजरंग सोनावणे होते. बैठकीनंतर बजरंग सोनावणे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
जिल्हा नियोजन समिती बैठकीत गैरव्यवहाराची सीडी, पेन ड्राईव्ह यांचा मुद्दा उपस्थित झाला का? असं विचारलं असता त्यांनी नाही असं म्हटलं, पुढे ते म्हणाले, पण जर कोणीला एकाला बाजूला करुन बोललं तर आम्ही पाहत राहणार नाही. दहशत कोणाची याचं उत्तर द्या सांगितलं. माजी पालकमंत्री म्हणाले इथे अधिकाऱ्यावर दहशत आहे. मग कोणाची दहशत आहे विचारल्यावर त्यावर बाचाबाची झाली. यानंतर बैठक संपली. अजित पवार बैठक सोडून निघून गेल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. वेगवेगळ्या पद्दतीने माडंलं असता आम्ही एका बाजूने आण ते दुसऱ्या बाजून बोलत होते. अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडची बदनामी करु नका सांगत होते. आम्ही बदनामी करतोय का?मर्डर, चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी, मटका चालवतोय का? सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचं काम करत आहोत. संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत आहोत, ही बदनामी आहे का? यावरुन बाचाबाची झाली, अशी माहिती बजरंग सोनावणे यांनी दिली.