Advertisement
मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, अशी मागणी होत आहे. मात्र, अद्याप पालकमंत्रीपदासंबंधी अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, आता 19 जानेवारीच्या आधी पालकमंत्रीपदाबाबत निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना दिली आहे.
एक महिना उलटून गेला असल्याने कुटुंब चिंतेत आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. सीआयडी, एसआयटी तपास करत आहे. न्यायाधीशांच्या मार्फतही चौकशी केली जात आहे. दोषींना थारा द्यायचा नाही अशी भूमिका आहे. ही निर्घृण हत्या आहे. कोणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे, चौकशीत मिळाले तर कारवाई केली जाणार आहे. ही अतिशत निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, कोणालाही थारा दिला जाणार नाही. चांगले एसपी पाठवले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे वाटेल ते करण्याचा अधिकार त्यांना दिला आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
