Advertisement
मुंबई : भारतीय जनता पार्टीच रविवारी शिर्डी येथे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट केलं. त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं. शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्ला केला. अमित शाहंचा तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला.
जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील,असं शरद पवार म्हणाले. पण, दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेलं बरं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
