#

Advertisement

Thursday, January 30, 2025, January 30, 2025 WIB
Last Updated 2025-01-30T12:16:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या... : राज ठाकरे संतापले

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार ४२ जागा ? ४ ते ५ जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना ४२ जागा ? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केल त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वरळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
लोकसभा निकालानंतर चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.   या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलय फक्त ते आपल्यापर्यंत आलेल नाही हे लक्षात घ्या. अश्या प्रकारच्या जर निवडणूका होत असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त केला. पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ज्या गोष्टी दिल्या. सांगितल्या, केल्या. जी आंदोलने केली, ज्याचे निर्णय लागले. त्या गोष्टी तुम्ही सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजे. आतापर्यंत आपण काय काय केलं. कोणती आंदोलने केली. कोणत्या विषयात हात घातला. त्यात काय निर्णय आला. त्यात तुम्ही कन्व्हिन्स पाहिजे. लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणं योग्य नाही, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.