Advertisement
राहुल गांधींचा गंभीर आरोप
दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत चर्चेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नवीन मतदार आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला. राहूल गांधी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याच राहुल गांधींनी म्हटलं आहे. ही मतदारांची संख्या कुठून आली? असा सवाल राहुल गांधींनी विचारलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, 'मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काय बोलले जात होते यावर माझे लक्ष केंद्रित करण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. कारण मी गेल्यावर्षी आणि त्यापूर्वीच्या वर्षी जवळजवळ असेच भाषण ऐकले होते. विरोधी पक्ष जर युती सरकार असते तर हे भाषण असे नसते, असे ते यावेळी म्हणाले. लोकसभेत राहुल गांधींनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केलीय. आपलं उत्पादन क्षेत्र आपण चीनच्या हाती सोपवलं असल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. सोबतच मेक इन इंडिया चांगली कल्पना होती पण अयशस्वी झाली असल्याचंही म्हटलंय.देशातील उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. .
