#

Advertisement

Saturday, March 15, 2025, March 15, 2025 WIB
Last Updated 2025-03-15T11:45:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Advertisement

मुंबई : शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असे गौरद्वगार पवार यांनी काढले आहे. त्यांच्या या पत्राविषयी त्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा माहिती दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. तर पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत, अशी मागणी काही साहित्यिकांनी केली आहे.तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.