#

Advertisement

Thursday, March 6, 2025, March 06, 2025 WIB
Last Updated 2025-03-06T11:15:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सायरस पूनावाला पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Advertisement

पुणे : पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे सायरस पूनावाला. लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे  मालक असलेले सायरस पूनावाला हे पुण्यातील एकमेव श्रीमंत व्यक्ती आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब एकूण 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. भारतातील श्रीमंताच्या यादीत सायरस पूनावाला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. 
2019 मध्ये जगात कोव्हीड आजाराने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण जगाता कोरानामुळे लॉकडाऊन लागला होता. कोरोनावर कोणतचं औषध नव्हते. अशा वेळी सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधात लस तयार केली.  कोरोना विरोधात लस निर्माण करुन सीरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला.  या बद्दल सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार केली. Covishield ही कोरोना महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस आहे.

भारतातील  टॉप-10 अरबपती
पोर्ट, एअरपोर्टपासून सीमेंट, ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारे अरबपती उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. एचसीएल टेक्नलॉजीसचे फाऊंडर शिव नाडर 3.14 लाख कोटीं रुपयांच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे मालक एस. पूनावाला या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर सन फॉर्मास्युटिकल्सचे मालक दिलीप सांघवी पाचव्या स्थानावर आहे. या यादीत कुमार मंगलम बिर्ला सहाव्या क्रमांकावर, गोपीचंद हिंदुजा सातव्या, राधाकृष्ण दमानी आठव्या, अझीम प्रेमजी नवव्या आणि नीरज बजाज दहाव्या क्रमांकावर आहेत.