Advertisement
भास्कर जाधवांच्या नावाला महायुतीचा विरोध
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेत्यांची निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस केली होती. पण भास्कर जाधव यांच्या नावाला महायुती सरकारमधून विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे. तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांना निलंबित केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यावर भास्कर जाधव यांनी टोकाची टीका केली होती. आक्रमक भास्कर जाधव महायुतीला डोईजड होण्याची भीती आहे. महायुतीचे नेते भास्कर जाधव यांना जाहीर विरोध करताना दिसत नाहीत. मात्र भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी विधिमंडळ कार्यालयानं संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद ठरत नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण राज्य सरकारनं केंद्राच्या 2006 च्या कायद्याचा हवाला देत संख्याबळाच्या आधारे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असे संकेत दिले होते.
