#

Advertisement

Monday, April 21, 2025, April 21, 2025 WIB
Last Updated 2025-04-21T09:12:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवा : अजय डोंगरे

Advertisement

वर्धा : स्थानिक नगरपरिषदेच्या सभेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याबाबत ठराव झालेला आहे. त्या ठरावानुसार नियोजीत जागी नगरपरिषदेने त्वरित अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवा, अन्यथा बहुजन रयत परिषदेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग पत्कारण्यात येईल, असा इशारा बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांनी निवेदन देताना दिला.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने नगरपरिषदचे मुख्याधिकारी देशमुख यांना शनिवार, १९ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हिरा खडसे, अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त नारायण आमटे यांच्या अध्यक्षेत निवेदन देण्यात आले. बहुजन रयत परिषदेच्या वतीने महामानव अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याबाबत १३ फेब्रुवारी २००६ ला झालेल्या विशेष सभेत ठराव क्रमांक ३ मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे. नवनिर्मित धरमकाट्याजवळील दुकान संकुलाच्या बांधकामासमोर नगरपरिषद मालकीच्या जागेवर महामानव साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा व त्या कामावर होणारा अंदाजीत खर्च २ लाख रुपये खर्च करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देते, असे ठरावात नमूद आहे. या ठरावाचे सूचक नगरसेवक चरणसिंग चावरे होते. अनुमोदन म्हणून नगरसेवक राजेंद्र मोडक होते. या ठरावाला कोणाचाही विरोध नाही, असे सभाअध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतरसुद्धा नगरपरिषद पुतळा बसविण्यासाठी का दिरंगाई करत आहे, असा प्रश्न झाला आहे. नगर परिषदेने अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ बसविण्यात आता दिरंगाई केली तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रयत परिषदेने दिला आहे. निवेदन देतेवेळी बहुजन रयत उपाध्यक्ष किशोर वाघमारे, शहराध्यक्ष भैय्या मुंगले, मनोहर डोंगरे, प्रशांत डोंगरे, वर्धा तालुकाध्यक्ष विनोद आमटे, शरला डोंगरे, सुनील पोटफोडे, किशोर मुंगले आदी उपस्थित होते.