Advertisement
दिल्ली : अमेरिकेची अभिनेत्री एम्बर हर्डचे जगभरात लाखो चाहते आहेत. एम्बरनं 2004 मध्ये फ्रायडे नाइट लाइट्स या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. जॉनी डेपशी घटस्फोट आणि कारवाईनंतर ती चर्चेत आली होती. त्यावेळी नवरा जॉनी डेप विरोधात असलेला हा खटला ती जिंकू शकली नाही. नवऱ्यासोबतचा हा खटला हरल्यानंतर तिनं सोशल मीडियापासून स्वत: ला लांब केलं आहे. त्यानंतर ती आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. आता एम्बर हर्ड ही जगातील सगळ्यात सुंदर महिला कशी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याविषयी जाणून घेऊया. गोल्डन रेशियो फिजिकल परफेक्शनचा सगळ्यात चांगला आणि परफेक्ट चेहरा शोधण्याची एक पद्धत आहे. या टेकनिकमध्ये डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी यासारख्या पॉइंट्सला मार्क करण्यात येतं. त्यानंतर पुन्हा कंप्युटरमध्ये फीड केल्यानंतर त्याच्या आधारावर मॅपिंक करण्यात येते.
कशी मोजतात सुंदरता?
सुंदरता कशी मोजतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर विज्ञानात त्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीला फेशियल मॅपिंग टेकनिक म्हणतात. त्यात काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ज्यावरून सुंदरता मोजतात. चेहऱ्याच्या सुंदरतेला मोजण्यासाठी ब्यूटी फी के ग्रीक गोल्डेन रेश्योचा वापर करण्यात येतो.
डॉ. ज्यूलियन डी सिल्वा यांनी याविषयी सांगितलं की हा रीसर्च मी गोल्डन रेशियोच्या आधारावरून केला आहे. यात सगळ्यात जास्त 91.85% एम्बर हर्डचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडा, चेहऱ्याचा आकार, गोल्डन रेशियोच्या जवळ आहे. एम्बर्ड ही जगातील सगळ्यात सुंदर महिला असलेल्या विज्ञान ही मान्य करते.
