#

Advertisement

Monday, April 21, 2025, April 21, 2025 WIB
Last Updated 2025-04-21T09:24:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ठाकरेंनंतर आणखी दोन मोठे नेते एकत्र येणार?

Advertisement

रामदास आठवले म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर आणि आम्ही...
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता रामदास आठवलेंनी अत्यंत महत्वाचं विधान केल आहे. रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना टाळी दिली आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील विविध गटांमध्ये विभागलेले कार्यकर्ते यानिमित्ताने एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो पाहिजे. आरपीआयच्या लोकांनी एकत्र आल पाहिजे असे आमचे प्रयत्न असतील, असेही आठवले म्हणाले. अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऑफिसला जाऊन आलो. न्यूयॉर्कला बाबासाहेबांचे स्मारक होण्याची मागणी आहे. तिथे बाबासाहेबांच्या वस्तुंचे म्युझियम असावे, अशी अमेरिकेतील लोकांची मागणी आहे. महाबोधी महाविहारचा विषय राज्यभरात गाजतो आहे. 100 भिक्षु बोधगाय येथे बसले आहे. महाबोधी महाविहार देण्याची मागणी केली जात असल्याचे आठवले म्हणाले. बौद्ध समाजाच्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक असावेत. यात 8 सदस्य हे बौद्ध समाजाचे असावे अशी मागणी असल्याचेही आठवले म्हणाले.


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. त्यांनी जरूर एकत्र यावे. जरी एकत्र आले तरी महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांना बाहेर पडावे लागेल. ते एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नसल्याचेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी-हिंदी भाषा वाद करू नये, असेही आठवले म्हणाले.