Advertisement
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी खोऱ्यातील दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये 28 भारतीयांचा मृत्यू झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यानंतर आज पाकिस्तानी शेअर बाजार उघडताच कोसळला. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. आज सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तानचा KSE-100 निर्देशांक 2.12 टक्के (2485.85 अंक) घसरून 1,14,740.29 अंकांवर आला.
पाकिस्तान शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला सुरुवात केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर दिसून येतोय. भविष्यात होणारे गंभीर परिणाम ओळखून पाकिस्तानी गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्याला पसंती दिली.त्यामुळे गुरुवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांकडून बेछूट विक्री पाहायला मिळाली. ज्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले.
भारतीय शेअर बाजारात थोडीशी घसरण
दुसरीकडे या संपूर्ण घटनेचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. गुरुवारी दुपारी 1.40 वाजेपर्यंत, बीएसई सेन्सेक्स 0.36% (285.31 अंक) घसरणीसह 79,831.18 अंकांवर आणि एनएसई निफ्टी 500.33% (80.55 अंक) घसरुन 24,248.40 अंकांवर व्यवहार करत होता. आज सेन्सेक्स 58.06 अंकांच्या घसरणीसह 80058.43 अंकांवर उघडला आणि निफ्टी 5051.05 अंकांच्या घसरणीसह 24,277.90 अंकांवर उघडला.