Advertisement
पक्ष अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : राज्यात आगामी काळात होत असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था अशा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीने सुरू केली आहे. यानुसार मोर्चे बांधणी तसेच निवडणुकीसंदभातील धोरण ठरविण्याकरिता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पक्ष अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी करीत असताना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी संघटना बांधणी योग्य पद्धतीने अधिक कार्यक्षम करण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या शनिवारी संघटनेच्या बैठका आयोजित करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, निरिक्षक, फ्रन्टल अध्यक्ष व सेल राज्यप्रमुख यांची संयुक्त बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी (ता. १६) राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट येथे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरिक्षक, सर्व फ्रन्टल संघटनांचे अध्यक्ष व सेल राज्यप्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
