Advertisement
दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.