Advertisement
दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठ घडणार आहे. मागच्या चार तासात ज्या वेगाने हालचाली सुरु आहेत, भारताकडून सर्वप्रथम सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याच अभियान चालवलं जाऊ शकतं. 2016 आणि 2019 मधील हल्ल्यानंतर भारताने आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर एअर स्ट्राइक केला होता.
दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. अमित शाह स्वत: सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत. काश्मीरमध्ये शाह यांनी एलजी मनोज सिन्हा आणि सैन्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. कोणालाही सोडणार नाही, असं शाह या बैठकीनंतर म्हणाले. दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही, असं अमित शाह म्हणाले आहेत. शाह यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पीएम मोदी सौदी अरेबियामध्ये होते. मोदी तिथला दौरा रद्द करुन तात्काळ देशात रवाना झाले. रिपोर्ट्नुसार पंतप्रधान मोदींनी भारतात येताना पाकिस्तानी एअर स्पेसचा वापर केला नाही. ते अन्य मार्गाने दिल्लीत आले. मोदी यांचा हा निर्णय पाकिस्तानसाठी थेट इशारा मानला जात आहे. दिल्लीत पीएम कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेणार आहेत. ही उच्च स्तरीय समिती आहे. यात सुरक्षेसंदर्भात मोठे निर्णय घेतले जातात.
पेहेलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्य प्रमुखांची बैठक घेतली. यात तिन्ही सैन्य प्रमुखांनी तयार असल्याच म्हटलं आहे. म्हणजे पुढच्या कारवाईसाठी सरकार जो काही निर्णय घेईल त्याच पालन केलं जाईल. मागच्यावेळी एअर फोर्सने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केलं होतं.