#

Advertisement

Monday, May 26, 2025, May 26, 2025 WIB
Last Updated 2025-05-26T13:28:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती

Advertisement

मुंबई : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील 311 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.
विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही 311 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले.
या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा केला. एमपीएससी ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील 311 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.  20 जून 2025 पर्यंत अर्ज मागविले आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार आहे. पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.