Advertisement
तुळजापूर: तुळजापूर-औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे, आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर-औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते.
समोर आलेल्या माहितीनुसार महामार्गावरील बेलकुंड उड्डाणपुलावरून जात असताना त्यांची कार रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे स्लिप झाली, कार स्लिप झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. कार सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली, या अपघातामध्ये आर.टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले हेते, त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.