Advertisement
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानवर हल्ला केला आहे. भारताने मध्यरात्री केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केला. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा देत या कारवाईला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी शरद पवारांनी एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधत चिंतेची बाब कोणती आहे हे सांगितलं आहे.
गेल्या आठवड्यात जे काही काश्मीरमध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती. निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27 लोकं जातात. भारत आणि पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीर त्यांनी 1948 मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली," असं सूचक विधान शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मीर हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झालं, ज्या घटना घडल्या त्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली. काश्मीरमधील विधानसभेत हाल्ल्याच्या विरोधात ठराव झाला. ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका घेत दहशतवादाला विरोध केला," असं शरद पवार म्हणाले. "पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल यासंदर्भातील सध्याचं भारताचं धोरण चुकीचं नाही," असं शरद पवार म्हणाले. "या मोहिमेला नाव जे दिलं ते योग्य दिलं गेलं, असंही पवार 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल म्हणाले.
