Advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आठ दिवसांनी वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिराला अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणावरुन थेट अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका होताना दिसली. मात्र यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना अजित पवारांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून राजेंद्र हगवणेच्या मागावर पोलिसांच्या तीन टीम पाठवण्यात आल्या आहेत असं गुरुवारी बारामतीमधील जाहीर सभेत सांगितलं होतं.
या प्रकरणामध्ये आधीपासूनच वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद अटकेत आहे. या तिघांनाही पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं असून वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिरालाही आता अटक करण्यात आली आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. शशांकबरोबर वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या आई-वडिलांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी दिली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता.