Advertisement
बडे नेते अजितदादांच्या गटात जाणार
जळगाव : शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. या जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षातील अनेक बडे नेते, माजी मंत्री, माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे 2 माजी मंत्री, 3 माजी आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील यांच्यासह चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, अमळनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे , माजी आमदार दिलीप वाघ आदी नेते तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
शरद पवार यांच्या पक्षातील या नेत्यांचा येत्या 3 मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सर्वच नेत्यांच्या पक्षप्रवेशाबात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.