Advertisement
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. रोज भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल अशा बातम्या समोर येत आहे. पहलगाम येथे 26 निप्षाप नागरिकांना मारलं. दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचं क्रूर कृत्य आहे. आतापर्यंत अनेक भ्याड हल्ले केले आणि नंतर त्याकडे पाठ फिरवून जगासमोर रडगाणं सुरु केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी होत आहे. सध्याची स्थिती पाहता युद्धाची स्थिती कधीही ओढावू शकते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात धाडधाड मोठे निर्णय घेत आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानला आतापर्यंत अनेक धक्के दिले आहेत. आता एलओसीजवळ मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या एलओसीजवळील नीलम खोऱ्यातील सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आले आहेत.
माहितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने एलओसीजवळील नीलम खोऱ्यातील सर्व हॉटेल्स रिकामे करण्याच आदेश देण्यात आला होता. या आदेशानंतर सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एलओसीच्या नीलम खोऱ्यातील हॉटेल्ससोबत विविध आस्थापनाही रिकामा करण्यात आल्या आहेत. खबरदाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.