#

Advertisement

Monday, May 26, 2025, May 26, 2025 WIB
Last Updated 2025-05-26T11:39:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमचं आणि कस्पटे कुटुंबाच दुःख सारखंच !

Advertisement

धनंजय देशमुख यांनी घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट 

पुणे : आमचं आणि कस्पटे कुटुंबाच दुःख सारखं आहे. आमचाही माणूस गेला आहे. छोटं बाळ आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ दिलं पाहिजे. हे सगळे भोग आहेत भोगावे लागतात. कस्पटे कुटुंबांना ह्यातून पुढं यावं. खरी परीक्षा पुढं आहे, आपल्याला सिद्ध करावं लागणारआहे. योग्य दिशा शोधली पाहिजे. न्याय घरी बसून मिळत नाही . त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं, उपोषण करावं लागतं. आमच्या भावान काय पाप केलं होतं? परंतु न्याय मागावा लागत आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी कोर्टात तिच्या हत्येचाही संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी संपूर्ण हगवणे कुटुंबाला बेड्या ठोकल्या आहेत. घटना उघड झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी वैष्णवीच्या माहेरी कस्पटे कुटुंबाला भेट देण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातच आज बीडमधील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमाबरोबर बोलत होते. 
पुण्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना त्या पावसातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी इतर कुटुंबीयांसह कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यांनी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. तसंच हा लढा कायदेशीर प्रक्रियेने लढण्यासंदर्भात चर्चा केल्याचं समजत आहे. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आईचीही भेट घेतली. ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुखही येथे भेटीसाठी पोहोचले होते.