Advertisement
पुणे : अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झालीआहे. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेश प्रक्रिया आज (26 मे 2025) सकाळी 11 वाजता सुरू झाली. या पूर्वी आलेल्या त्रुटी राज्य शिक्षण विभागाने दूर केल्या आहेत. अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टल mahafyjcadmissions.in - पुन्हा सुरू करणार आलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी सुरळीतपणे पूर्ण करता येणार आहे. FYJC प्रवेश अधिकृतपणे २१ मे रोजी सुरू झाले होते. पण, काही तासांतच विद्यार्थी आणि पालकांना पोर्टलमध्ये प्रवेश करण्यात अडचणी आल्या. विशेषतः मोबाइल डिव्हाइसवर या अडचणी दिसून आल्या. नोंदणी दरम्यान अनेकांना त्रुटी जाणवल्या. यामुळे पालक त्रस्त झाले. यानंतर शिक्षण विभागाने देखभालीसाठी वेबसाइट ऑफलाइन केली होती.
पोर्टल पुन्हा उघडल्याने, विद्यार्थ्यांनी सुधारित अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बदल झालाय. कारण राज्याने प्रथमच केंद्रीकृत ऑनलाइन प्रणाली सुरू केली. पूर्वी प्रवेश प्रदेश-विशिष्ट होते पण नवीन प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये निर्बंधांशिवाय अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया स्टेप बाय स्टेप
अकरावी प्रवेश प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahafyjcadmissions.in वर जा. "नवीन विद्यार्थी नोंदणी" वर क्लिक करा आणि वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (इयत्ता १० ची गुणपत्रिका, ओळखपत्र पुरावा इ.). पसंतीची महाविद्यालये आणि स्ट्रीम (विज्ञान, वाणिज्य, कला इ.) निवडा. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत स्वत:कडे ठेवा.
अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज कसा आणि कुठे भरायचा?
सगळ्यात आधी https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दोन टप्प्यात अर्ज भरायचा आहे.
पहिल्या भागात तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे.
दुसऱ्या भागात तुम्हाला हवे असलेले कॉलेज भरायचे आहेत. तुमच्या पसंती नुसार क्रम लावायचा आहे. (तुम्ही जास्तीत जास्त १० पर्याय निवडू शकता)
अर्ज फी: अकरावी प्रवेशाची अर्जाची फी फक्त 100 रुपये आहे.
प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थी आपल्याला पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला नसेल तर पुढील फेरीसाठी पसंतीक्रम पुन्हा भरावा लागेल.
अर्ज भरण्यात अडचण आल्यास...
अर्ज भरण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 8530955564 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.