#

Advertisement

Saturday, May 24, 2025, May 24, 2025 WIB
Last Updated 2025-05-24T12:14:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

फक्त सुंदर दिसतात म्हणून महिला आयोगाचे पद दिले ?

Advertisement

करुणा शर्मा-मुंडे यांचा आरोप 

मुंबई :  वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्याप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.  यात आता करुणा शर्मा-मुंडे या पण हिरारीने उतरल्या आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या कारभारावर तुफान हल्लाबोल चढवला. फक्त सुंदर दिसतात म्हणून महिला आयोगाचे,रुपाली चाकणकर यांना पद दिल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी महिला आयोगाचे पद नाही, रुपाली चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.
महिला आयोगाकडे 901 महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील किती महिलांना न्याय दिला, असा सवाल करुणा शर्मा-मुंडे यांनी चाकणकर यांना केला. पक्षासाठी फिरण हे रुपाली चाकणकर यांचे काम नाही तर महिला आयोगाकडे येणार्‍या तक्रारींना न्याय देणं हे काम आहे, असा टोला ही त्यांनी चाकणकरांना लगावला आहे.रुपाली चाकणकर यांना माज आहे म्हणून चिल्लर असा शब्द त्यांच्याकडून वापरला जातो, अशी टीका करुणा मुंडे यांनी केली. चिल्लर या रुपाली चाकणकर यांनी उल्लेख केलेल्या शब्दावर, करुणा शर्मा मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. 
पोलीस, प्रशासन, महिला आयोग यांच्याकडे अनेक चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने,आम्हीही आता आत्महत्या करावी का ? असा सवाल काही महिलांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत असलेल्या या महिलांनी,रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत तीव्र आक्षेप घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.


महाराष्ट्रात वैष्णवी, पूजा चव्हाण, करुणा, या अशा घरोघरी आहेत, असे त्या म्हणाल्या. महिला आयोगाकडे तक्रार दाखल करूनही काही कारवाई न झालेल्या दोन पीडित महिला पण यावेळी करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत होत्या. रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलांना दिला नाही तर तक्रार देणार्‍या 35 हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला.