Advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे रोहिणी खडसे यांची मागणी
मुंबई : वैष्णवीच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अक्षम चुका दिसत आहे. महिला आयोगाकडे जवळपास 32 हजार केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कमी पडत आहे. आयोग महिलांना लवकर न्याय देत नाही. कारण महिला आयोगाचे अध्यक्ष हे पार्टटाइम आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा या अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पार्ट टाईम महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलून पूर्ण वेळ अध्यक्ष महिला आयोगाला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबाबाबत आलेल्या तक्रारीवर महिला आयोगाने कारवाई केली असती तर आज वैष्णवी जिवंत असती. वैष्णवीच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिनेसुद्धा माहिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये सासऱ्याने मारहाण केल्याचा उल्लेख होता. त्यानंतरसुद्धा आयोगाने कारवाई केली नाही. उलट महिला आयोगाने ही घटना समोपचाराने मिटवली. या प्रकरणात आयोगाने हगवणे कुटुंबाला पाठिशी घातले. कारण ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.