#

Advertisement

Monday, May 26, 2025, May 26, 2025 WIB
Last Updated 2025-05-26T13:13:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हगवणेच्या संपत्तीचा आकडा माहित आहे का?

Advertisement

पुणे : हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस सून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपी राजेंद्र  हगवणेंकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राजेंद्र हगवणे हा पुण्याजवळील मुळशीतला. मुळशी पॅटर्न सिनेमामध्ये ज्या प्रकारे अचानक जमिनींना भाव आल्यानंतर अनेक गुंठा मंत्री बनले हगवणेही त्याच मानसिकतेचा. मुळशीतल्या भुकुम गावामध्ये हगवणेची 12 एकर जमीन आहे. भुकुम गाव हे जवळपास आता पुणे शहरातच मोजलं जातं. कारण अवघ्या काही मिनिटांवर म्हणजेच जवळपास 7 किलोमीटवर हे गाव वसलेलं आहे. इथे वन बीएचकेचा रेट ५० लाख रुपये आहे. अशा भागात हगवणेंची 12 एकर जमीन आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार इथे गुंठ्याचा भाव 30 लाख रुपये आहे. म्हणजे हगवणे जवळपास 144 कोटी रुपयांच्या जमीनीचा मालक आहेत. त्याच्याकडे अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. बंगले आहेत, पुण्यात फ्लॅट आहेत, फ्लॉट आहेत, मोठाल्या मशीन आहेत. या सगळ्याची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हगवणेची ही प्रॉपर्टी कष्टाची नाहीये. ती वडिलोपार्जित आहे.
राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे या भागातील राजकीय प्रस्थ होतं. आधी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते राष्ट्रवादीत आले. तुकाराम हगवणे पंचायत समितीचे सभापती होते. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेतही होते. पण राजेंद्र हगवणे कधीच तेथून निवडून आला नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2004 साली राजेंद्र मुळशी विधानसभा लढला. पण त्याला यश मिळाले नाही. तो सपाटून पडला. नंतर पंचायत समिती, भुकुम ग्रामपंचायतीमध्ये देखील तो चांगलाच हरला. त्याला गावकऱ्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही. मात्र, पवार कुटुंबाशी संबंध असल्यामुळे तो सत्ताधीश असल्यासारखा वावरायचा. मुळशी विभागातील प्लॉटिंगचा व्यवहारात त्याने करोडो रुपये छापले. वैष्णवीचा नवरा हा पोकलेन, जेसीबी आणि डंपरचा त्याचा व्यवसाय होता.