Advertisement
मुंबई : आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे. MCXवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोनं 287 अंकांनी घसरून 93360वर ट्रेड करत असून चांदी 429 अंकांनी घसरून 96338 वर व्यवहार करताना दिसत आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं घसरलं असलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 3,250 डॉलरच्या जवळपास आहे. तर चांदी 33 डॉलरच्या आसपास आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
मंगळवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली होती. मात्र आज सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 96,060 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 88,050 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची घट झाली असून 72,040 रुपये प्रतितोळावर सोनं पोहोचलं आहे.
पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 88,050 रुपये
24 कॅरेट- 96,060 रुपये
18 कॅरेट- 72,040 रुपये