Advertisement
दिल्ली : प्रेमानंद महाराज ज्यांनी विराट कोहलीला निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर 'तू आनंदात आहेस का?' असा प्रश्न विचारला. ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्या प्रत्येकालाच विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं एक वेगळं रुप दिसलं ते प्रेमानंद महाराज फक्त देशातच नाहीत तर जगभरात लोकप्रिय आहेत. अनेकदा विराट कोहली सह कुटुंब प्रेमानंद महाराजांकडे जाताना दिसतो. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जातात. अशा लोकप्रिय प्रेमानंद महाराज यांच्या खासगी आयुष्याबद्दलही लोकांना जाणून घ्यायचं आहे.
प्रेमानंद महाराज यांचं आश्रम मथुरा येथे आहे. हा एक सामान्य आश्रम नाही. प्रेमानंद महाराजांचे आज असंख्य अनुयायी आहेत. त्यांच दर्शन घेण्यासाठी अनेक श्रद्धाळु येतात. एवढंच नव्हे त्यांच्या भोजनाची व्यवस्था देखील असते. तसेच आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी अनेक लोक येतात. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. तसेच अनेक सामाजिक कार्य देखील या आश्रमाच्या माध्यमातून केलं जातं.
प्रेमानंद महाराज यांचा दररोजचा जेवणाचा खर्च हा४००-५०० रुपयांचा आहे. महाराज सांगतात की, माझे कोणतेही मित्र नाहीत. महाराजांचा दावा आहे की, माझ्याकडे एक रुपयाही नाही. माझ्याकडे मोबाईल फोन नाही आणि कधी घेणारही नाही. मी घर सोडताना जसा होतो तसाच आजही आहे. एकही चमचा माझा नाही. सरकारी कागदपत्रांमध्ये तुम्हाला प्रेमानंद हे नाव कुठेही लिहिलेले आढळणार नाही. माझे ना बँक खाते आहे ना प्रेमानंदची सही आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे. मी दुःख स्वीकारले आहे, मला दुःखाची भीती वाटत नाही. मी दुःखात असतानाही देव मला मिठी मारतो. महाराज सांगतात की, त्यांच्या नावावर एकही रुपया नाही किंवा त्यांचे घर किंवा जमीन नाही.
पैसे कुठून येतात?
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दररोज सुमारे 3 कोटी रुपये खर्च केले जातात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं जेवण, सेवा कार्य आणि इतर व्यवस्थांचा खर्च यामध्ये करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच येथे पुरवल्या जाणाऱ्या सगळ्या सेवा पूर्णपणे मोफत केल्या जातात. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या इतक्या मोठ्या आर्थिक व्यवस्थेचा मुख्य स्रोत म्हणजे भक्तांकडून मिळणारी देणगी. त्यांच्या अनुयायांमध्ये अनेक मोठे उद्योगपती आणि दिग्गज मंडळी आहेत, जे नियमितपणे आश्रमाला आर्थिक मदत करतात. याशिवाय, महाराजांचे प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम हे देखील आश्रमाचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. प्रेमानंद महाराज भव्य आश्रम चालवत असले तरी त्यांचे वैयक्तिक जीवन अगदी साधे आहे. महाराज आपल्या अनुयायांना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा संदेश देतो. विराट कोहलीसारखे मोठे स्टार देखील त्याच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने प्रभावित होतात, ज्यामुळे त्याचा प्रभाव आणि लोकप्रियता आणखी वाढते.