#

Advertisement

Monday, June 16, 2025, June 16, 2025 WIB
Last Updated 2025-06-16T12:59:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गौतमी पाटील होणार 'लाडकी बहीण'

Advertisement

अण्णा नाईकांसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार 

मुंबई : महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहिण योजना' सुरु केली. ही योजना अतिशय लोकप्रिय ठरली. आता या योजनेवर लवकरच सिनेमा येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना सिनेमा रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटील आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईक या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 
गणेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. 'लाडकी बहीण'ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. 
या चित्रपटामध्ये मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात 'लाडकी बहीण'मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.