#

Advertisement

Thursday, June 19, 2025, June 19, 2025 WIB
Last Updated 2025-06-19T12:06:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राज्यभर चर्चा

Advertisement

शरद पवारांचा उल्लेख; नेमकं काय म्हणाल्या? 
मुंबई : फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात खासदार शरद पवार यांना वेगळे महत्त्व आहे. दिल्लीमध्ये आजही त्यांचे वजन कायम आहे. संरक्षण, कृषी, सहकार, नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील समस्यांवर तोडगा काढायचा असतो तेव्हा शरद पवार यांचा सल्ला जरूर घेतला जातो. त्यांचं राष्ट्रीय राजकारणात असलेलं महत्त्व निर्विवाद आहे. असे असतानाच आता त्यांची कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांत्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर चॅट जीपीटीने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. त्याचीच सध्या महाराष्ट्रभ चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये जगातील आणि महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू काय आहे? याविषयी माहिती देण्यात आलीय. एका मुद्द्यात जागतिक पातळीवरील राजकीय केंद्रबिंदू तर दुसऱ्या मुद्द्यात महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू याविषयी माहिती देण्यात आली आहे. 

सुप्रिया सुळे यांना नेमकं काय सांगायचंय?
जगाच्या राजकारणात अमेरिकेला फार महत्त्व आहे. अमेरिकेने घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा परिमाण संपूर्ण जगावर होतो. अमेरिकेने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर जगभरातील नागरिकांना त्याची झळ बसते. त्यामुळेच जागतिक राजकारणात अमेरिका हा महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या भूमिका आणि वाचार यांना राजकारणात वेगळे महत्त्व आहे. कदाचित हेच सुप्रिया सुळे यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधून सांगायचे आहे, असा अंदाज बांधला जात आहे.