Advertisement
मुंबई : अभिनेत्री अन प्रसिद्ध मॉडेल शेफाली जरीवालानं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी तिच्या अचानक झालेल्या या निधनानं तिचा नवरा पराह त्यागीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत राहत्या घरी तिनं अखेरचा श्वास घेतला. शेफालीला तिच्या नवऱ्यानं आणि कुटुंबातील लोकांना रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं. शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाखतीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं एक महत्वाची इच्छा व्यक्त केली होती.
शेफाली जरीवालाने 2004 साली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शेत्यानंतर सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून साउथ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होतं. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात ‘कांटा लगा’ या गाण्यावर तिने डान्स केला होता. जे गाणं नंतर खूप सुपरहिट ठरलं. त्यानंतर शेफालीने ‘नच बलिए’, ‘बूगी वूगी’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही झळकलेली पाहायला मिळाली. पुनीत राजकुमारच्या कन्नड चित्रपट ‘हुडुगारु’ मध्ये शेफाली ‘पंकजा’ या गाण्यावर पुनीत राजकुमारसोबत डान्स करताना दिसली होती.
मृत्यूनंतर शेफाली जरीवालाची एक पूर्वीची मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत शेफालीने म्हटले होते की, 'माझ्या मृत्यूपर्यंत मला 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखलं जावं, जगात एकच 'काटा लगा गर्ल' ती मीच'. शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.