Advertisement
शिवसेनेची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
मुंबई : छत्रपती शिवरायांचा इतिहास सीबीएससी अभ्यासक्रमात असावा यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेकडून केंद्रीय शिक्षण विभागाला पत्र देण्यात आल आहे. तमाम देशवासियांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, शासन, कार्य तसेच वारसा यांची माहिती देशाच्या भावी पिढीपर्यंत नेण्याबरोबरच भारताचा समृद्ध इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सीबीएससीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवजी महाराज यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या योगदानाला सीबीएससीच्या पाठ्य पुस्तकातही योग्य स्थान मिळाले पाहिजे. त्यांच्या इतिहासाचा समावेश सीबीएससीच्या अभ्यासक्रमात केल्याने देशभरातील विद्यार्थी यांना भारताचा समृद्ध इतिहास तसेच विविध संस्कृती यांचा अधिक जवळून चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यास मिळणार आहे. त्यामुळे आगामी शैक्षणीक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात सामवेश करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी जेणे करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला ती एक आदरांजली ठरेल, असे खासदार वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठवलेले पत्रात नमूद केले आहे.