#

Advertisement

Tuesday, June 24, 2025, June 24, 2025 WIB
Last Updated 2025-06-24T11:57:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी

Advertisement

उद्धव ठाकरेंनी तेजस्वी घोसाळकरांबाबत घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : मुंबै बँक ही मुंबईतली सहकार क्षेत्रातली महत्त्वाची बँक. ही बँक राजकीयदृष्ट्या कायमच चर्चेत असते. या बँकेच्या संचालकपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अभिषेक घोसाळकर हे नियुक्त होते. मात्र, गेल्यावर्षी अभिषेक घोसाळकरांची धक्कादायकरित्या फेसबुक लाईव्ह सुरु असतांनाच गोळ्या घालून हत्या झाली. यानंतर अभिषेक घोसाळकरांचे संचालकपद जवळपास वर्षभर रिक्त राहिलं.  गेलं वर्षभर रिक्त असणारं हे पद ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भरलं गेलं. मुंबै बँकेत तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड करुन भाजपनं मुंबईत मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. भाजपच्या खेळीवर उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारला आहे.
मुंबै बँकचे संचालकपद जवळपास वर्षभर रिक्त होते. मात्र, गेलं वर्षभर रिक्त असणारं हे पद ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भरलं गेलं. सद्भावना म्हणून हे रिक्त पद अभिषेक यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आलं. तेजस्वी घोसाळकर या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या.  मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सध्या भाजपचे प्रविण दरेकर आहेत. त्यामुळे हे पद तेजस्वी घोसाळकरांना देण्याच्या टायमिंगमागे भाजपची खेळी असल्याची चर्चा रंगली आहे.  तर, दुसरीकडे  त्यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप त्यांचेच सासरे   विनोद घोसाळकरांनी केला होता. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर ठाकरेंना कधीही रामराम ठोकतील अशी चर्चा असतांनाच त्यांच्या  मुंबै बँकचे संचालकपदाच्या नेमणूकाच्या टायमींगची चर्चा आहे.