#

Advertisement

Tuesday, June 24, 2025, June 24, 2025 WIB
Last Updated 2025-06-24T12:05:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Advertisement

पुणे : जिल्ह्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 22 जून रोजी पार पडली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेल्या अजित पवारांनी निवडणूक प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं. मागील पाच वर्षाच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शना खालील संचालक मंडळ काम करत होतं. आता मात्र स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना तावरे गटानं कडवं आव्हान दिलं आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारावर शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये, असं मत शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलं आहे. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी  संस्थांच्या निवडणूक लढवली नाही. ⁠विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. शरद पवारांनी हा प्रश्न विचारत अजित पवारांना टोला लगावला असल्याचं मानलं जात आहे. 


अजित पवार विजयी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले. श्री नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना 91 तर त्यांचे प्रतिस्पर्धी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली.