Advertisement
युगेंद्र पवारांची होणारी बायको आहे तरी कोण
बारामती : शरद पवारांचा नातू युगेंद्र पवारांचा साखरपुडा पार पडला आहे. मुंबईची मुलगी बारामतीची सूनबाई होणार आहे. युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. याआधी जय पवार यांचा साखरपुडा झाला होता. आता युगेंद्र पवारचा साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबात एकाच वर्षी दोन विवाहसोहळे होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेनचा साखरपुडा सुंदर तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही प्रार्थना. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे!, अशी खास पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे.
शरद पवार यांचे नातू. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र. बारामती तालुका कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष. फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम पाहतात. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे ते खजिनदार आहेत. युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवारांसोबत असतात, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत.