#

Advertisement

Monday, June 30, 2025, June 30, 2025 WIB
Last Updated 2025-06-30T12:01:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडे पुन्हा मोठ्या अडचणीत

Advertisement

विनयभंग प्रकरणातील आरोपींसोबतचा फोटो व्हायरल 
बीड : शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली.  या प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडेनी केली‌.  बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपीसोबत होते असं धनंजय मुंडे यांनी म्हटल आहे. तसंच पोलीस तपासावरही त्यांनी शंका व्यक्त केली असून प्रकरणाची SIT चौकशी करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटल आहे.  पत्रकार परिषदेनंतर आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आल आहे.