Advertisement
धुळे : भाजपने धुळ्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते आणि धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील 75 वर्षांची काँग्रेसची साथ सोडणार आहे.
कुणाल पाटील काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. याबद्दलची मोठी घोषणा कुणाल पाटील यांनी सांगितलं की, उद्या 1 जुलै मंगळवारी दुपारी 2 वाजता भाजप पक्षात प्रवेश करतोय. ही गोष्ट अधिकृतपणे निश्चित झाली आहे. तीन पिढ्यांनी काँग्रेसची साथ दिल्यानंतर कुणाल पाटील यांनी काँग्रेसची साथ का सोडली याबद्दल त्यांनी या मुलाखत सांगितलं आहे. त्यावर कुणाल पाटील म्हणाले की, लहानपणापासून पाहिलं की काँग्रेस हा आपला पक्ष आहे आणि काँग्रेसशीच आपण एकनिष्ठ राहायच. आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानचे मोठे झालो. माझे आजोबा पंडीत नेहरू यांच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले खासदार होते. आमच्या वडिलांनी ती ख्याती पुढे चालू ठेवली. तेही 7 वेळा आमदार झालेत. मी पण 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो. फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं. 2019 मध्येही लोकांनी माझी साथ दिली.