#

Advertisement

Saturday, June 21, 2025, June 21, 2025 WIB
Last Updated 2025-06-21T11:27:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एअर इंडियाच्या विमाला अपघात प्रकरणी : तीन अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश

Advertisement

दिल्ली : अहमदाबादमध्ये 12 जूनला एअर इंडियाचा विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील फक्त एक प्रवाशी वाचला. तर 241 जणांचा मृत्यू झाला. हे विमान लंडना जात असताना वसतिगृहावर कोसळलं. त्यातील 24 जणांसह एकूण 265 जणांचा नाहक बळी गेला. आता या प्रकरणात डीजीसीएने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ने मोठी कारवाई केली आहे.
डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून "ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार" असलेल्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही अधिकारी ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे आणि आता त्यांना कोणत्याही क्रू व्यवस्थापन कामापासून दूर ठेवले जाईल.
डीजीसीएने एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि त्यांच्या प्रगतीचा आणि निकालांचा अहवाल 10 दिवसांच्या आत संस्थेला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एअरलाइनच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल मानकांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या वेळापत्रक प्रक्रिया सुधारण्यास सांगितलं आहे. डीजीसीएने असेही स्पष्ट केलं आहे की उड्डाण सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.