Advertisement
राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्त शाहू शिक्षण संस्थेकडून भव्य मिरवणूक
मंगळवेढा : राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने मंगळवेढा शहरातील प्रमुख रस्त्यावर संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथम, झांज पथक, शारीरिक कसरती व चित्तथरारक शिवकालीन खेळांनी परिसरातील नागरिकांची लक्ष वेधले. नागरिकांची प्रचंड संख्येने गर्दी करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कलेचे काैतूक केले. विशेष म्हणजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही लेझीम खेळात सहभागी होत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
शाहू जयंतीच्या निमित्ताने शाहू शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सजविलेल्या टॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, शिवाय विद्यार्थाच्या हातात समाज प्रबोधनाचे पोस्टर शोभून दिसत होते. या मिरवणुकीमध्येया मिरवणुकीमध्ये बाळकृष्ण विद्यालय भाळवणी, छत्रपती शिवाजी विद्यालय खोमनाळ, स.ना. देशमुख प्रशाला कामती बु, भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी, एम.पी. मानसिंगका विद्यालय सोड्डी, प्राथमिक आश्रम शाळा येड्राव, शरण बसवेश्वर विद्यामंदिर नंदुर पारंपरिक नृत्य, महात्मा गांधी विद्यालय वाघोली लेझीम, स्वामी विवेकानंद प्रशाला सोलापूर विविध महापुरुषांचे वेशभूषा, आश्रम शाळा येड्रॉव लेझीम , महासिद्ध विद्यामंदिर डोनज लेझीम, पडोळकरवाडी लेझीम, शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर पाटखळ लेझीम, कुमार स्वामी विद्या मंदिर जत पहिलवान वेशभूषा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोलापूर येथील नवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ व बहुद्देशीय संस्था राजवाडे चौक, नवीपेठ सोलापूर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचा मर्दानी खेळ सादर केला. सोलापूर येथील नवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ व बहुद्देशीय संस्था राजवाडे चौक, नवीपेठ सोलापूर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचा मर्दानी खेळ सादर केला.