Advertisement
मंगळवेढा : उजनीतून भिमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून वारी तोंडावर उजनी उजव्या कालव्यातुन मंगळवेढा तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे भरुन देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी निवेदनातून केली.
या संदर्भातील निवेदन अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांना दिले असून या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उजनी धरणातुन भिमा नदी मध्ये जवळपास ३० ते ३५ हजार क्युसेक्सने नदीत पाणी प्रवाह चालु आहे. उजनी धरण सध्या क्षमतेच्या ७०% पेक्षा जास्त भरले आहे, त्यामुळे यापुढे जास्त पाणी साठा करता येत नाही. मागील १५ ते २० दिवसापासुन पावसाने मंगळवेढ्यात उघडीप दिली आहे. शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी पाऊस पडल्यामुळे ८० ते ९०% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या उरकलेल्या आहेत.
आषाढ वारीमुळे खरीपाच्या पेरण्या वाया जाण्याचे संकट उभा राहीले. तालुक्यात गुंजेगांव, मारापुर, घरनिकी, कचरेवाडी, खोमनाळ, मरवडे, तळसंगी, डोणज, नंदुर, बोराळे, हुलजंती, कागष्ट, कर्जाळ, कात्राळ व या लाभक्षेत्रातील ओढ्यातुन, नाल्यातुन पाणी सोडून सर्व पाझर तलाव सिमेंट बंधारे भरुन द्यावेत, उजनी उजव्या कालव्यातन पाणी तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील पाणी वाटपाचे नियोजन चुकल्यामुळे उजनी कालव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन करावी लागले, प्रसंगी शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले. तर मारापुर परिसरामधील शेतकऱ्यांना पाणी देताना अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागले त्यामुळे अतिरिक्त पाणी भीमा नदी पात्रातून वाया सोडून वाया जाण्यापेक्षा ते पाणी शेतीला देणे आवश्यक आहे अशी मागणी लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.