Advertisement
पुण्यातील धानोरी नंतर आता नवी मुंबईत असाच प्रकार
पुणे / मुंबई : आखाडाची संधी पुण्यातल्या एका दाम्पत्यानं हेरली आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. एक दोन नव्हे तर तब्बल 5 हजार किलो मोफत चिकनचं वाटप या दाम्पत्यानं केले. जसा मोफत चिकन वाटपाचा बॅनर पुण्यात लागला. तशी पुणेकरांनी या चिकनशॉप बाहेर रांगा लावल्या. पुण्यातल्या धानोरी भागात धनंजय जाधव फाउंडेशनकडून हे मोफत चिकन वाटप करण्यात आले. गर्दी कमी करण्यासाठी 4 दुकानांत हे मोफत चिकन वाटप सुरु आहे. अट एकच ओळखपत्र दाखवा आणि चिकन मिळवा. ही ऑफर चांगलीच हिट ठरली.
पुण्यात 5 हजार किलो मोफत चिकन वाटपनंतर आता नवी मुंबईत 2500 किलो चिकण फुकट वाटण्यात आले आहे. नवी मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना 2500 किलो मोफत चिकनचे वाटप करण्यात आले. फुटक चिकण मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
आषाढ अमावस्या अर्थात गटारी अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरु होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करत आहेत. जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोबा गर्दी केलेली पहायला मिळत आहे.