#

Advertisement

Wednesday, July 23, 2025, July 23, 2025 WIB
Last Updated 2025-07-23T11:25:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एलएलबी प्रवेश : राज्यातून तब्बल ५७ हजार ८९२ अर्ज दाखल

Advertisement

उमेदवारांत तीव्र स्पर्धा : प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज दाखल

मुंबई :  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येत असलेल्या पदवीनंतरच्या तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी (एलएलबी) राज्यातून तब्बल ५७ हजार ८९२ उमेदवारांची अर्ज दाखल केले आहे. उपलब्ध प्रवेक्ष क्षमतेच्या जागांच्या तुलनेत तिप्पट उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहे.
एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय करत जण उच्च शिक्षणाच्या माध्यमातुन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एलएलबीच्या शिक्षणाचा पर्याय निवडत असल्याचे आढळून येते. एलएलबी करुन त्यात नव्याने चांगले करिअर करण्याचा मार्ग बहुसंख्य उमेदवार स्विकारत  आहेराज्यभरातून एलएलबीच्या सीईटी परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
एलएलबीच्या महाविद्यालयांची संख्या  वाढत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील २०६ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांच्या माध्यमातुन सुमारे २० हजार ७४० एवढ्या प्रवेशाच्या जागा तुर्तास उपलब्ध आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा उमेदवारांच्या अर्ज जास्त दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे.
एलएलबीच्या कॅप फेरीसाठी सीईटी सेलने अर्ज भरण्यास ३० जूनला सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी (ता.२१) संपली. एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्यांपैकी ५१ हजार ३३४ उमेदवारांनी सर्व माहिती मुदतीत अर्ज लॉक केले आहेत. आत्तापर्यंत ३७ हजार ६९५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झाली आहे. उमेदवारांनी पुरेशा कागदतत्रांची पुर्तता केली नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून येत आहे. सीईटी सेलकडून आवश्यक कागदपत्राच्या पडताळणीसाठी २५ जुलैपर्यंतचा कालावधी दिलेला आहे.