Advertisement
DGCA ने गांभिर्याने दखल घेत दिले चौकशीचे आदेश
दिल्ली: अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असतानाच भारतात आणखी एक भायनक विमान दुर्घटना होता होता टळली आहे. दिल्ली विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर एअर इंडियाचे विमान 900 फूट खाली कोसळले. क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. मात्र, विमानाने सुक्षित लँडिग केले आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. DGCA ने याची गांभिर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
12 जून 2025 रोजी भारतात एक मोठी विमान दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनमुळे जगभरात खळबळ माजली. यानंतर आता मोठी विमान दुर्घटना टळली आहे.
14 जून रोजी दिल्लीहून व्हिएन्नाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 777 विमान VT-ALJ ने 2:56 वाजता उड्डाण केले. हे विमानाचे उंचीवर उड्डाण करत असताना नियंत्रण सुटले. हवेत उडणारे हे विमान 900 फूट खाली आले. विमानाने धोकादायक उंची गमावल्यानंतर विमानात बसलेले प्रवासी गोंधळले. प्रवाशांनी आरोडा ओरडा सुरु केला. कंट्रोल रुम मार्फत पालयटशी संपर्क साधला जात होता. विमान खाली कोसळत असताना वारंवार पायलटला ‘GPWS डोंट सिंक' आणि ‘स्टॉल वॉर्निंग' अशा सूचना दिल्या जात होत्या.
पायलटने मोठ्या शर्थाने विमानावर नियंत्रण मिळवले. पायलटने विमान सुरक्षित उंचीवर नेले आणि उड्डाण सुरु ठेवले. यानंतर अखरे 9 तास 8 मिनिटांनी विमान व्हिएन्नामध्ये सुरक्षितपणे लँड झाले. त्यानंतर, ते दुसऱ्या क्रूसह टोरंटोला रवाना झाले. जर विमान नियंत्रणात आले नसते तर मोठी विमान दुर्घटना घडली असती. याबाबत वैमानिकाने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की 'टेक-ऑफनंतर टर्ब्युलन्समुळे स्टिक शेकर सक्रिय झाला'. या घटनेनंतर डीजीसीएने चौकशी केली आणि कडक कारवाई केली. जेव्हा B-777 चा डेटा तपासला गेला तेव्हा विमानात अनेक मोठ्या समस्या आढळून आल्या.