#

Advertisement

Tuesday, July 1, 2025, July 01, 2025 WIB
Last Updated 2025-07-01T16:56:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा होऊ शकत नाही !

Advertisement

मुंबई :  विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. “या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे” असं नाना पटोले म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. “तुमच्याकडून अससंसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.
“जर भाजपचे आमदार आणि कृषीमंत्री मोदी शेतकऱ्यांचा बाप आहे असं बोलत असतील. मोदी यांचा बाप असू शकतो, पण शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. शेतकऱ्यांना अपमानित करण्यासाठी हे सत्तेत आहेत का?. शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात म्हणून हे सत्तेत आहेत का? यापेक्षा असंवैधानिक काय असू शकतं” असा सवाल नाना पटोलेंनी केला. सभागृहातून निलंबन झाल्यानंतर ते बाहेर माध्यमांशी बोलत होते.