#

Advertisement

Wednesday, July 16, 2025, July 16, 2025 WIB
Last Updated 2025-07-16T11:28:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्यासंदर्भात ऑफर दिल्याची चर्चा आहे. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी पाहायला मिळाली.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ऑफर दिली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट ऑफर देण्यात आली. उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात.... संजय केणेकर यांचा विवाह युग देखील त्यांनी जुळवला. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदन दिले.ते कट्टर सावरकर आहेत..जरीही बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते भक्त असतील पवार साहेबांचा कधीही सावरकरांना विरोध न्हवता, असेही ते म्हणाले.