#

Advertisement

Thursday, July 17, 2025, July 17, 2025 WIB
Last Updated 2025-07-17T13:01:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधीमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Advertisement

मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. काल दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. त्याचं रुपांतर आज हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद इतक्या टोकाला गेला होता की, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामध्ये एकीकडे जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर यांना 'जा जा' असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर त्यांना, "दाखव की मी इथे एकटाच आहे. तुझ्या किती दम आहे बघतो. तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही" अशा शब्दांत प्रत्युत्तर देत असल्याचं ऐकू येत आहे.
या वादावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं की, जर तुम्ही विनाकारण छळलं तर तोही ऐकत नाही आणि कार्यकर्तेही ऐकत नाही. तुम्ही तुमच्या घरचे मोठे, मी माझ्या घऱचा मोठा. माझ्या वैयक्तिक राजकीय भूमिकेवर टीका करत अर्बन नक्षल असंच असतात म्हणाले होते. मी काही न बोलता पुढे गेलो आणि माझ्या भाषेत उत्तर दिल्यावर इतकं का झोंबलं? मस्ती करायची नाही आणि केली तर सहन करायची ताकद ठेवायची. कार्यकर्त्यांनी जो रंग दाखायचा तो दाखवला. सत्ताधारी आहोत म्हणून माज दाखवू हा प्रकार योग्य नाही. सत्तेत असलेल्यांना हे मारक आहे. 40 वर्ष मुंबईत बाप नसताना राजकारण करणारा मी माणूस आहे, असंही त्यांनी सांगितलं.