Advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्ष प्रवेश पहायला मिळत आहे. या पक्ष प्रवेशामुळे भाजपची पावर वाढणार तर पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसणार असणार आहे. शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्ही बसणरा आहे. माजी मंत्र्याचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, दुसरीकडे 35 वर्षांपासून सोबत असलेले राजाभाऊ मुंडे हे पंकजा मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षाच प्रवेश करणार आहेत.
सागंलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे स्वगृही म्हणजेच भाजपात परत आले आहेत. दोन्ही मुलांसह अण्णा डांगे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमण डांगेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अण्णा डांगे यांनी 20 वर्षांपूर्वी भाजपाची साथ सोडली होती. मात्र] आता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.