Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून मंत्रिमंडळात मोठा बदल करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मोबाईलवर पत्त्त्यांचा रमी गेम खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोर धरली होती. पण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांच्याकडून कृषी खात काढून नवीन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या जागी दत्तात्रेय भरणे यांची कृषिमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये गुरुवारी 31 जुलैला बैठक झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सरकारने या दोन मंत्र्यामध्ये खात्यांची बदलाबदली केली आहे.