#

Advertisement

Friday, August 1, 2025, August 01, 2025 WIB
Last Updated 2025-08-01T12:22:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का

Advertisement


शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरण 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हासंदर्भातील प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह यासंदर्भात तातडीने सुनावणी व्हावी अशी ठाकरेंच्या पक्षाची इच्छा आहे. यासंदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामात यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर 20 ऑगस्टला सुनावणी पार पडणार होती. मात्र, राष्ट्रपतींच्या प्रकरणावर घटनापीठाच्या सुनावणीला 19 ऑगस्टपासून सुनावणी पार पडणार आहे. न्यायमुर्ती सुर्यकांता हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात न्यायाधीश आहेत. त्याचबरोबर न्यायमुर्ती सुर्यकांता यांचा राष्ट्रपतींच्या संदर्भातील घटनापीठात्मक समावेश असल्यानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.