#

Advertisement

Monday, July 7, 2025, July 07, 2025 WIB
Last Updated 2025-07-07T11:10:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निशिकांत दुबेच्या बुडाला आग लागणं हे स्वाभाविकच...!'

Advertisement

निशिकांत दुबेंच्या बेताल वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया 
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोक आमच्याच पैशांवर जगतात असं वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्राकडे ना खाणी आहेत ना उद्योगधंदे अशापद्धतीने वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदारावर उद्धव ठाकरेंनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. 
निशिकांत दुबेच्या बुडाला आग लागणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांची लायकी नसतानाही बोलत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुणा गोविंदाने रहात आहेत. हे पाहून भाजपच्या बुडाला आग लागली आहे. दुबेसारखे लकडबग्गे म्हणजे तरस आहे. ज्यांची लायकी नसताना ते बोलत आहेत. असल्या विधानांमधून आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
हिंदी ही राज्य भाषा आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाहीच. राज्यभाषेसाठी जे जे लागेल ती मदत करु. पण हिंदी सक्तीला आमचा विरोध असल्याच यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना शिवसैनिक जातपात धर्म न बघता मदत करत आहेत, हे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 
मूळभाजपा ज्यांची शिवसेनेसोबज युती होती तो पक्ष मेलेला आहे. त्याला मारून टाकल आहे. आताच्या भाजपने उर बडवे घेतले आहेत या पक्षातून त्या पक्षातून लोकं घेत आहे. आम्ही एकत्र आल्याने महाजन याच्या सारख्या लोकांच्या बुडाला आग लागली आहे. असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.